पेण येथून रत्नागिरीचा इसम बेपत्ता

| अलिबाग | प्रतिनिधी |

पेण येथून रत्नागिरीतील 42 वर्षीय इसम बेपत्ता झाला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी जिते येथील हॉटेल पार्क इन सहारा जवळ घडली. याप्रकरणी दादर सागरी पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.

प्रवीण पंढरी मोहिते असे या बेपत्ता इसमाचे नाव आहे. हा इसम मुळचा रत्नागिरी जिल्ह्यातील वेळंम येथील रहिवासी आहे. मंगळवार दि.12 रोजी सायंकाळी पेण येथ आले होते. दरम्यान सायंकाळी पाच वाजण्याच्या सुुमारास ते बेपत्ता झाले. ठिकठिकाणी त्यांची चौकशी करण्यात आली. तरीदेखील ते सापडले नाहीत. त्यामुळे दि.14 रोजी श्रावणी मोहिते यांनी दुपारी दादर सागरी पोलीस ठाण्यात हरविल्याची फिर्याद नोंदविली आहे. प्रवीण यांचे वर्णन उंची पाच फुट दोन इंच, रंगाने सावळे आहेत. अंगाने सडपातळ, चेहरा उभट असून अंगात सफेद फुलशर्ट आणि निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली असे आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. एस. ठाकूर अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version