। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील सर्वात जुनी शिवजयंती म्हणून नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज जयंती ओळखली जाते. उद्या तिथीप्रमाणे नेरळ गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची जंयती साजरी होणार असून त्या निमित्ताने कलाकारांसाठी रांगोळी आणि चित्रकला स्पर्धा भरवली गेली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने नेरळ गावातील बापूराव धारप सभागृहात रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेत अनेक कलाकारांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धचे सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन शिवजंयती उत्सव समितीचे पदाधिकारी यांचे हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली. रांगोळी स्पर्धेत लहान गटामध्ये ओम पाटील – प्रथम, स्पृहा सावंत – दुसरी, प्रतीक भारती- तिरा तर मोठ्या गटात श्रुती गुप्ता- प्रथम, सविता भारती-दुसरी, अनुराधा कांबळे-तिसरी, तसेच विकी कांबळे, अखिल तांबोळी, निलेश थॉम्ब्रे आणि युवांश पवार यांना उत्तेजनार्थ पारितोषक जाहीर करण्यात आले. या सर्व स्पर्धाकांना शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात सन्मानित केले जाणार आहे.