कृषीवल जाज्वल्य विचारांचे व्यासपीठ

सिनेतारका सई ताम्हणकर यांचे गौरवोद्गार

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

कृषीवल वृत्तपत्रामार्फत जनतेचे प्रश्‍न मांडण्याबरोबरच ते सोडविण्याचा प्रयत्न करीत असताना, महिलांच्या सक्षमीकरणासाठी हळदी-कुंकू समारंभ भरवित आहे. सर्व घटकातील महिलांना एकत्र आणण्याचे काम या उपक्रमातून केले जात आहे. वेळेबरोबरच काळानुसार बदलणे खुप महत्वाचे आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना एकत्र आणून विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी त्यांना यातून दिली जाते. हा खुप प्रगतशील उपक्रम आहे. अशा उपक्रमासोबत चित्रलेखा पाटील व सुप्रिया पाटील यांच्यासारख्या महिला उभ्या राहतात. त्यावेळी या उपक्रमांना अधिक चांगली गती व सकारात्मक दृष्टीकोन मिळतो, असे प्रतिपादन मराठी सिनेतारका सई ताम्हणकर यांनी केले.

कृषिवलच्या 88 व्या वर्धापन दिनानिमित्त कुरुळ येथील क्षात्रैक्य समाज हॉलमध्ये मिस कृषीवल व मिसेस कृषीवल हा फॅशन शो शुक्रवारी (दि.07) सायंकाळी आयोजित केला होता. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी कृषीवलच्या सल्लागार संचालक सुप्रिया पाटील, व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील, अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, माजी नगरसेवक वृषाली ठोसर, रजनी घरत, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख प्रिती पाटील, आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील, शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते जगन्नाथ म्हात्रे, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, सदस्य निखील मयेकर, कृषीवलचे सल्लागार संपादक प्रसाद केरकर, कार्यकारी संपादक माधवी सावंत, कृषीवलचे वरिष्ठ सहायक संपादक आविष्कार देसाई, सहाय्यक संपादक सुयोग आंग्रे, प्रमोद जाधव, व्यवस्थापक रुपेश पाटील, जाहीरात व्यवस्थापक हर्षा पाटील, सचिन गुप्ता, दर्शना पाटील, भैरवी जाधव, समृध्दी म्हात्रे, अंकित भानुशाली, वरिष्ठ उपसंपादक राकेश लोहार, डिजीटल उपसंपादक संतोष राऊळ, कला संपादन केदार गुरव, मानसी गोतावडे, कल्याणी भगत, शुभांगी गुळेकर, अंतरा पारंगे, योगिता वडके, सानिका म्हात्रे आदींसह संपादकीय, जाहीरात, वितरण व बायडींग विभागाचे कर्मचारी तसेच, परीक्षक किरण साष्टे, लक्ष्मी मुकादम, ज्योती बावधनकर-राऊळ, मेकअप आर्टीस्ट अमित वैद्य, अंकिता राऊत, जगदीश झोरे, कोरीओग्राफर जयेश पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुयोग आंग्रे तर संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रतिम सुतार यांनी केले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना सई ताम्हणकर म्हणाल्या की, शेतकरी, कामगार, कष्टकरी, गोरगरीबांच्या हक्कासाठी सुरु झालेल्या दैनिक कृषीवलसारख्या वृत्तपत्राने 88 वर्षाची परंपरा जपली आहे, ही एक अभिमानाची गोष्ट आहे. ही परंपरा पुढे नेण्यासाठी एखादी स्त्री पुढे येते. त्यावेळी ही गोष्ट अधिक भव्यदिव्य होते. त्याचे उदाहरण म्हणजे चित्रलेखा पाटील आणि सुप्रिया पाटील होय. कृषीवल नावाचे वृत्तपत्र जनसामान्यांच्या हक्काचे एक व्यासपीठ आहे. या वृत्तपत्राच्या माध्यमातून तुमचे प्रश्‍न मांडण्याची संधी मिळाली आहे. प्रत्येकाला असे व्यासपीठ मिळत नाही. मात्र, अलिबागसारख्या ठिकाणी जाज्वल्य विचारांचे कृषीवल सारखे व्यासपीठ मिळाले आहे. त्याचे एक समाधान आहे.

जनतेचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करताना, सामाजिक उपक्रम राबविले जातात, अशा वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त पाहुणे म्हणून येण्याची संधी मिळाली, त्याचा मला फार आनंद होत आहे. कृषीवलच्या वर्धापन दिनानिमित्त फॅशन शोचे आयोजन केले आहे. या शोमध्ये ग्रामीण भागाचे महत्व पटवून देण्याचे काम केले आहे. ही सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, असे म्हणत सिनेतारका सई ताम्हणकर यांनी कृषीवलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची उंची वाढली- चित्रलेखा पाटील
कृषीवल वर्धापन दिनानिमित्त महिलांसाठी फॅशन शो स्पर्धेचे आयोजन केले. एक चांगला उपक्रम या निमित्ताने राबविला आहे. चूल व मूल या पलिकडेही महिलांचे जग आहे, हे यातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. महिला आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. फॅशन शोच्या जगतामध्येही महिला कमी नाहीत. विशेष करून अलिबागसह संपुर्ण जिल्ह्यातील महिला व मुलीदेखील या क्षेत्रात प्रगती करीत असल्याचा आनंद आहे. कृषीवलच्या टीमने चांगला कार्यक्रम राबविला आहे. सई ताम्हणकर सारख्या सिनेकलाकार उपस्थित राहिल्याने या कार्यक्रमाची उंची अधिकच वाढली आहे.
कृषीवलमध्ये रायगडचे प्रतिबिंब 
आजचा कार्यक्रम खुपच छान झाला आहे. रायगड जिल्हा मुंबईजवळ असला तरीही ग्रामीण भागाचा वर्चस्व असलेला आहे. कृषीवल वर्धापन दिनानिमित्त महिलांसाठी फॅशन शो घेणे खुपच कठीण काम होते. महिलांच्या कलागुणांना वाव देण्याची संधी या कार्यक्रमातून उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमाला प्रतिसादही अपेक्षेपेक्षा मिळाला. कृषीवलचे 88 वे वर्ष असून पुढे आणखी जोमाने वाटचाल करण्याचा प्रयत्न राहणार आहे. बदलत्या काळानुसार वाचकांच्या पसंतीनुसार कृषीवलने काम केले आहे. कृषीवलची डिजीटल आवृत्तीदेखील आहे. जगभरात डिजीटलच्या रुपाने कृषीवल आज घराघरात पोहचले आहे. रायगडचे योग्य प्रतिबिंब पोहचविण्याचा प्रयत्न कृषीवल करीत आला आहे, त्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन कृषीवलचे सल्लागार संपादक प्रसाद केरकर यांनी केले.
कृषीवलने कायमच महिलांचा सन्मान केला- माधवी सावंत
कृषीवलने आजपर्यंत महिलांचा सन्मान केला आहे. कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रालेखा पाटील यांनी महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्याचे काम केले आहे. मग ते राजकीय, सामाजिक, शैक्षणिक असे कोणतेही क्षेत्र असू दे, त्या सर्वच क्षेत्रात महिला पुढे गेल्या पाहिजे ही, त्यांची भावना राहिली आहे. महिलांसाठी व्यासपीठ मिळवून दिले आहे. त्यांच्यासारखे नेतृत्व अलिबागकरांसह रायगडकरांना मिळाले आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण त्या कोणत्याच चळवळीत मागे नाहीत. कृषीवलची घोडदौड 88 वर्षे चालू आहे. ही दौड शंभरहून अधिक वर्षे चालेल अशा विश्‍वास आहे. वर्धापन दिनानिमित्त एक चांगला कार्यक्रम राबविला आहे. त्याचे खरे श्रेय कृषीवल टीमला जाते. कारण या टीमने प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे फॅशन शो यशस्वी झाला, असे प्रतिपादन कृषीवलच्या कार्यकारी संपादक माधवी सावंत यांनी केले.
मीनाक्षी पाटील यांना श्रध्दांजली
शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे कृषीवलच्या वाटचालीत मोठे योगदान राहिले आहे. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी भुमिका बजावली आहे. कृषीवलच्या वर्धापन सोहळ्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देत मीनाक्षी पाटील यांना कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, पत्रकारीता, उद्योग, वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.
मिसेस कृषीवलची मानकरी - हर्षदा धिवरे
फर्स्ट रनरअप - प्रियांका राऊत
सेकंड रनर अप - प्रिती पाटील
बेस्ट वॉक - जागृती भगत,
बेस्ट पर्सनॅलिटी - ननिता भोसले
बेस्ट कॉस्टूम - प्रतिक्षा मुळीक
ब्युटी विथ ब्रेन - प्रार्थना प्रशांत नागावकर,
बेस्ट स्माईल - जितेश्री चौगुले,
फोटोजेनिक फेस - सेजल हाडकर
मिस कृषीवलची मानकरी - हिमानी गायकर
फर्स्ट रनरअप - दक्षता देसाई
सेकंड रनर अप- श्रुती शिरसाठ
बेस्ट वॉक - रिध्दी सुर्वे
बेस्ट पर्सनॅलिटी - आदिती पाटील
बेस्ट कॉस्टूम - कांचन मोहिरे
ब्युटी विथ ब्रेन - आदीती म्हात्रे
बेस्ट स्माईल - स्मितल म्हात्रे
फोटोजेनिक फेस - तलिशा चौगूले
Exit mobile version