नागरिकांची मागणी कारवाईची मागणी
| मुरूड | प्रतिनिधी |
मुरूड-एकदरा परिसरात पहाटेच्या वेळी धुक्याऐवजी प्लॅस्टिकच्या विषारी धुराची चादर पसरत आहे. या परिसराला विषारी वायूचा विळखा पडत आहे. मॉर्निंग वॉक येणार्यांना ऑक्सिजन ऐवजी प्रदुषित विषारी वायुचा श्वास घ्यावा लागतो. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत प्रदुषण नियंत्रण मंडळाने ठोस कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.
या परिसरात भंगारवाले तांब्याच्या तारा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाळ करत आहेत. यामुळे प्लॅस्टिकपासून निर्माण होणारा विषारी वायू मोठ्या प्रमाणात हवेमध्ये पसरुन मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या धुराचे प्रमाण इतके असते की संपुर्ण परिसरात धुक्याऐवजी काळ्याभोर विषारी धुराची चादर पसरलेली पहावयास मिळते आहे. या प्रदुषण करणार्या भंगारवाल्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी करीत आहेत.