। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
मोटारसायकल वरून जाणाऱ्या पोलीस हवालदाराच्या मोटारसायकलला क्रेटा कारने धडक दिली. या धडकेत पोलीस हवालदार बंडू बापू भिसे (50) हे जखमी झाले. या अपघाताप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात 18 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार बंडू भिसे हे कळंबोली येथे राहत असून, नवी मुंबई पोलीस दलात नोकरी करतात. ते रबाळे एमआयडीसी येथे काम करत असून 17 जानेवारी रोजी ते रात्रपाळीवर होते. एम एच 03 बीबी 6410 ने रात्री आठच्या सुमारास पुरुषार्थ ब्रिज कामोठे येथे पोहोचले असता पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या क्रेटा कारने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यात त्यांच्या खांद्याला कॉलर बोनला फ्रॅक्चर झाले आणि त्यानंतर कारचालक पळून गेला.
अपघातात पोलीस हवालदार जखमी
