पनवेलमध्ये जमावबंदीचा आदेश जारी

। पनवेल । वार्ताहर ।

निवडणूक आयोगाने दि.15 डिसेंबर 2025 रोजीचे अधिसुचनेनुसार महानगरपालिका निवडणुक 2025 करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामधील नवी मुंबई महानगरपालिका पनवेल महानगरपालिका निवडणुकीकरीता 23 ते 30 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत निवडणुक कार्यक्रमांतर्गत उमेदवार किंवा त्यांच्या कोणत्याही सुचकाकडून नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यात येणार आहे. तसेच, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 2 जानेवारी 2026 आहे. त्या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष नामनिर्देशन पत्र सादर करतेवेळी उमेदवारांच्या समर्थनार्थ शक्ती प्रदर्शन करणे, विविध वाहनांचा वापर करणे, घोषणाबाजी करणे यामुळे किरकोळ कारणावरून वाद निर्माण होऊन पक्ष कार्यकर्त्यामध्ये असंतोषाचे वातावरण तयार होते. तसेच रहदारीच्या नियमनात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सार्वजनिक शांततेचा भंग होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई रश्मी नांदेडकर यांनी प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामधील पनवेलमध्ये जमावबंदी आदेश जारी केला आहे.

Exit mobile version