नेरळमधील अपंग संघटनेचा उपोषणचा इशारा

| नेरळ । वार्ताहर ।

नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये 130 अपंग यांना ग्रामपंचायत कडून पाच टक्के अपंग निधी देण्यात आला नाही असा आरोप करीत अंध आणि अपंग विकास संस्था नेरळ शाखेचे कार्यकर्ते उपोषणाला बसणार आहेत. मात्र याबाबत नेरळ ग्रामपंचायतने अपंग निधी वेळेवर वाटप करण्यात आला असून सर्व 130 लाभार्थ्यांना चेकद्वारे लाभ देण्यात आला आहे अशी माहिती ग्रामविकास अधिकारी यांनी दिली आहे.

ग्रामपंचायत हद्दीत 130 दिव्यांग लोक राहत असून त्यांना रोजगार करण्यासाठी ग्रामपंचायतमधील एकूण उत्पन्नातील 5 टक्के निधी धनादेशद्वारे वाटप केला जातो. मात्र त्या निधीबाबत नेरळमधील अंध अपंग संस्था यांनी आक्षेप घेतला असून ग्रामपंचायतकडून सर्व लाभार्थी दिव्याग व्यक्तींना लाभ दिला आहे. परंतु आमच्या अपंग लाभार्थी यांना तो निधी मिळाला नाही आणि त्यामुळं उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सुनील राजे यांनी दिली आहे.त्यांनी प्रसिद्धीस दिलेले पत्रात आम्हाला अपंग निधी मिळाला नाही असे नमूद केले आहे.त्याचवेळी ग्रामपंचायत निधी दिल्याचे सांगत असेल तर ग्रामपंचायत ने त्याचे पुरावे द्यावेत असे आव्हान दिले आहे. मात्र ग्रामपंचायत पुरावे देत नसल्याने आम्ही उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहोत अशी माहिती अंध अपंग संस्थेचे अध्यक्ष सुनील राजे यांनी दिली आहे.

मागील तीन वर्षाचे धनादेश देण्यात आले असून ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्न मधील पाच टक्के निधीचे वाटप पूर्ण झाले आहे. त्यांना दिलेल्या धनादेशाचे माहिती ग्रामपंचायत कार्यालयात कधीही उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे अपंग बांधवांनी उपोषणाचा अवलंब करू नये.

गणेश गायकर
नेरळ ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी
Exit mobile version