मुख्यमंत्र्यांची निव्वळ स्टंटबाजी

| नाशिक | प्रतिनिधी |

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांच्याकडे पैशांनी भरलेल्या मोठमोठ्या बॅगा होत्या असर गंभीर आरोप केला होता. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाशिक दौऱ्यावर आले असता ते हेलिकॉप्टरमधून उतरताच त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या बॅगांमध्ये काहीच आक्षेपार्ह आढळले नाही, असा दावा करण्यात आला. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

याबाबत अंबादास दानवे म्हणाले की, त्या दिवशी बॅगा का चेक केल्या नाहीत? आता आरोप केल्यानंतर ते बॅगांमध्ये काही घेऊन जाणार आहेत का? ही फक्त नाटकबाजी आहे. त्या दिवशी बॅगा का नाही चेक केल्या, याचे उत्तर तपास यंत्रणांनी द्यावे. मुख्यामंत्र्यांनी आणलेल्या बॅगा कुठे गेल्या याची तपासणी करावी. आरोप केल्यानंतर तपासणी झाल्याचे दाखवायचे. नेहमी मुख्यमंत्री जशी शो बाजी करतात तशी त्यांनी केली आहे.

Exit mobile version