साळाव पूल आता बॅ. ए.आर. अंतुले ‘सागरी सेतू’

नामफलकाचे जुलेखा तांडेल यांच्या हस्ते अनावरण
रेवदंडा | वार्ताहर |
साळाव पुलास बॅ. ए.आर. अंतुले ‘सागरी सेतू’ असे नाव देऊन त्या नामफलकाचे अनावरण ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्या जुलेखा अब्बास तांडेल यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम सलिमभाई तांडेल मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आला.

अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यास जोडणारा रेवदंडा-साळाव पूल तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांच्या प्रयत्नाने करण्यात आला; परंतु या पुलाचे शुभारंभ व नामफलक लावण्याचे औदार्य शासनाने दाखविले नाही. याची खंत काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या व पै. बॅ. ए.आर. अंतुले यांचे निकटवर्गीय जुलेखा अब्बास तांडेल यांना होती. अखेर सलिम तांडेल मित्रमंडळाने पुढाकार घेऊन जुलेखा तांडेल यांची स्वप्नपूर्ती करण्याचे निश्‍चय केला. आणि, रेवदंडा बाजूने साळाव पुलास बॅ. ए.आर. अंतुले ‘सागरी सेतू’ नामफलकाचे अनावरण दि. 24 जुलै रोजी अकरा वाजता करण्यात आले.

याप्रसंगी सलिमभाई तांडेल मित्रमंडळाचे वतीने सलिम तांडेल, रेवदंडा ग्रा.पं. सदस्य राजन वाडकर, संदिप खोत, मिलिंद चुनेकर, सुहास घोणे, राजू चुनेकर, सलिम गोंडेकर, अंकित फुंडे यांनी काँग्रेसच्या जेष्ठ कार्यकर्त्या जुलेखा तांडेल यांच्या हस्ते फीत कापून साळाव पुलाचे बॅ. ए.आर. अंतुले सागरी सेतू असे नामकरण करण्यात आले.

Exit mobile version