जुगार अड्ड्यावर धाड


| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

चिखले येथील बीएआरसी वसाहतीत राहणारे मारुती गडकरी यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पनवेल तालुका पोलिसांनी धाड टाकून जवळपास 14 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. चिखले येथे मोकळ्या जागेत पत्त्यांवर पैसे लावून तीन पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 22 ऑगस्ट रोजी रात्री बाराच्या सुमारास बीएआरसी कॉलनीवळ, मारुती गडकरी यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत तीन पत्ती खेळत असलेल्या 14 जणांवर पनवेल तालुका पोलिसांनी धाड टाकून त्यांच्याकडून तीस हजार चारशे चाळीस रुपये जप्त केले. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष लहू केणी (कॉलेज फाटा, वडघर), सोहेल मोहम्मद अमीर पटेल (तळोजा) बापू हिराजी अनुभोले (रा. इंद्रप्रस्थ अपार्टमेंट, कर्नाळा बँकसमोर, टपाल नाका, पनवेल) बॉबी संतोष मेढेकर (चिखले), कमलाकर रामा भगत (कोळीवाडा, शंकर मंदिराच्या मागे, पनवेल), रामदास गणपत म्हात्रे (चिखले), अनिल मारुती पाटील (बेलवली) भगवान जगन्नाथ पाटील (धाकटा खांदा), शंकर धर्मा धुमाळ (भिंगारी गाव), जयंत नामदेव हूद्दार (मोठा खांदा), अविनाश राम म्हात्रे (बेलवली), संदेश सिताराम पाटील (चिपळे), किशोर म्हात्रे, पद्माकर उर्फ पद्या शेळके (दोघेही पाहिजेत, आदई) यांना पनवेल तालुका पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे.

Exit mobile version