रसायनीत दारुच्या हातभट्टीवर धाड

| रसायनी | वार्ताहर |

रसायनी पाताळगंगा परिसरातील वडगाव डोंगराळ भागात गैरफायदा गावठी दारुच्या हातभट्टीवर धाड टाकून 1,20,000 हजाराचा साहित्याचा साठा सापडला. याबाबत माहिती अशी की वडगाव डोंगराळ भागात सावळाराम दशरथ पवार (वय 37) याने अवैध गावठी हातभट्टीची तयार दारु करण्याकरिता एकूण 2400 लिटर गुळ मिश्रीत रसायन असे एकूण 1,20,000 हजार रुपये किमतीचा प्रोव्हीजन साहित्याचा साठा करुन ठेवला होता. रसायनी पोलिसांची चाहूल लागताच तो तेथून पसार झाला. यात 1 लाख किमतीचे निळ्या रंगाचे 10 प्लास्टिकचे 200 लिटर क्षमतेचे ड्रम मिळून आले. प्रत्येक ड्रमामध्ये 200 लिटर प्रमाणे एकूण 2000 लिटर दारु तयार करण्याचे गुळ मिश्रीत तांबड्या व सफेद रंगाचा उग्रवास येत असलेला रसायन प्रति लिटर 50 रुपये किमतीचे ड्रम जप्त केले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे, सहाय्यक फौजदार कोलेकर, मंगेश लांगी, डफल यांनी कारवाई केली. दरम्यान, मिळून आलेल्या रसायनापैकी एक लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये नमुन्याकरता रसायन काढून उर्वरित रसायन व हातभट्टीचे साहित्य वाहतुकीस अवजड असल्याने जागीच नष्ट करण्यात आले.

Exit mobile version