जिवंतपणाची अनुभूती देणारी रांगोळी

नांदगावचे अनिरुद्ध खेडेकर यांची कलाकृती

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |

गोंडस बाळाच्या आंघोळीच्यावेळी बाळाच्या चेहऱ्यावरून ओघळणारं पाणी रांगोळीतून साकारणं म्हणजे आव्हानच. मात्र, काही तरी हटके करायचंच या अशा हेतूनं पछाडलेल्या मुरूड तालुक्यातील’ नांदगावचा रांगोळीकार अनिरुद्ध खेडेकर याने वॉटर मॉर्फ रांगोळी प्रकारामध्ये सलग 12 तास काम करून ही रांगोळी रेवदंडा येथील रंगावली प्रदर्शनामध्ये साकारली आहे. रांगोळी पाहताना ती रांगोळी आहे यावर आपला विश्वासच बसत नाही, हीच या अवलिया कलाकाराची पोचपावती आहे. अनिरुद्ध खेडेकर यांनी पाण्याखालील रांगोळी साकारुन आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. ही रांगोळी पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करीत आहेत.

Exit mobile version