| नंदुरबार | वृत्तसंस्था |
नंदुरबारमधील एका नामांकित शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाला असून आरोपी कंत्राटी सफाई कामगारावर बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेत कंत्राटी सफाई कामगाराने पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या मोबाईलमध्ये आश्लील व्हिडीओ दाखवण्याचा प्रकार उघड झाला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या घटनेविषयी विद्यार्थिनीने आपल्या पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी नंदुरबार शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. तक्रारीवरून शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सफाई कर्मचाऱ्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेकडून त्या सफाई कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.