लोहगड किल्ल्याची प्रतिकृती

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील जे गड आहेत, त्या गडकोटाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी कर्जत तालुक्यातील तरुणवर्ग एकवटला आहे. या किल्ल्यांचे महत्व शहरातील सर्वांना व्हावे या हेतूने कर्जत शहरातील डेक्कन जिमखाना येथील तरुण वर्गाने लोहगड किल्ल्याची प्रतिकृती बनवून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

कर्जत शहरातील डेक्कन जिमखाना येथील कचेरी रोड भागातील कपालेश्‍वर गृह निर्माण संस्थेत राहणार्‍या लहान बच्चे कंपनीने एकत्र येत किल्ले लोहगडाची प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेतला होता. डिजिटलच्या युगातदेखील बच्चे कंपनी मोठे किल्ले बनवण्यास पसंती देत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. बहुसंख्य गावांमध्ये अजूनही बच्चे कंपनी आणि तरूण किल्ले बनविण्यास पसंती देत असतात.

हा किल्ला साकारण्यासाठी अंकुश गुप्ता, अनमोल गुप्ता, कुणाल गुप्ता, पवण गुप्ता, देवेश गुप्ता, तुषार गुप्ता, पार्थ गुप्ता, अनिरुध्द कदम, प्रज्ञेश मगर, तेजस सुर्वे, मोहीम जाधव, निनाद जाधव, अक्षय कांबळे तेजस पुरे आदींनी मेहनत घेतली.

Exit mobile version