इंग्लंडची धुळदाण; भारताचा दणदणीत विजय

मालिकेत 2-1 ने आघाडी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

यशस्वी जैस्वालच्या शानदार द्विशतकानंतर गोलंदाज रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीच्या जोरावर भारताने राजकोट कसोटीत इंग्लंडचा तब्बल 434 धावांनी धुव्वा उडवला. भारतीय संघाने चौथ्या डावात इंग्लंड संघाला विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 122 धावांवरच संपुष्टात आला. भारताचा आतापर्यंतच्या इतिहासातील इंग्लंडवर सर्वात मोठा विजय असून, या ऐतिहासिक विजयाने भारतीय संघ मालिकेत 2-1ने आघाडीवर आहे.

भारताकडून दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने जोरदार फटकेबाजी केली. त्याने 236 चेंडूंत 12 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने नाबाद 214 धावा काढल्या. यशस्वीच्या खेळीमुळे भारताकडे 556 धावांची आघाडी घेतली. जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज मानल्या जाणाऱ्या जेम्स अँडरसनची त्याने सलग तीन षटकार लगावत धुलाई केली. त्यामुळे इंग्लंडला 557 धावांच्या विशाला लक्ष्याचा पाठलाग करावा लागला. टीम इंडियाच्या 557 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 122 धावांवर ढेपाळला. भारताकडून रवींद्र जाडेजाने पाच, तर कुलदीप यादवने दोन गडी बाद करीत त्याला उत्तम साथ दिली.

Exit mobile version