हैदराबादचा दणदणीत विजय

। बेंगळुरू । वृत्तसंस्था ।

बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकात 3 गडी गमावून 287 धावा केल्या. ट्रेविस हेडने 102 धावा करत आपले आयपीएलमधील पहिले शतक पूर्ण केले आहे. आरसीबीकडून लॉकी फर्ग्युसनने 2, तर रीस टोपली याने 1 विकेट घेतली.

आरसीबीला 20 षटकात हे आव्हान पूर्ण करण्यात अपयश आले. आरसीबीला 20 षटकात केवळ 262 धावा करता आल्या. आरसीबीकडून दिनेश कार्तिकने 83, तर कर्णधार फाफ डु प्लेसीसने 62 धावा केल्या. हैदराबादकडून पॅट कमिन्सने 3 आणि मयंक मार्कंडेयने 2 विकेट्स घेतल्या.

हैदराबादने आयपीएल 2024 मध्ये 6 सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन सामन्यात संघाला अपयश आले आहे. संघ आपल्या चार विजयांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे, तर आरसीबी गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहे. आरसीबीला या आयपीएलमध्ये काही खास कामगिरी करता आली नाही. संघ 7 पैकी 6 सामने हारला आहे.

Exit mobile version