रशियन डॉक्टरांकडून दातांच्या शिबीराला प्रतिसाद

| खारेपाट । वार्ताहर ।
प्राथमिक शाळा आवास येथे आकांक्षा राणे आयोजित इ. 1 ते 4 थी च्या विद्यार्थ्यांची रशियन डॉक्टरांकडून मोफत दातांच्या शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला. डॉ. आदिती शेटकर आणि वैभव कुमार यांनी मोफत डेन्टेल कॅम्प शिबीर आयोजित करुन आ. सा. धो. र. हि. मंडळाची स्व. प्रभाकर सदाशिव राणे प्राथमिक शाळा आवास मधील इ. 1 ली ते 4 थी पर्यंतच्या सर्व मुलांची मोफत तपासणी केली.

सदर दातांच्या शिबीराला डॉ. जी. डी. पोल फांउडेशन व्हाय. एम. टी. डेंन्टल कॉलेज अ‍ॅण्ड चारिटेबल हॉस्पिटल खारघर नवी मुंबई येथील डॉ. वैभव, डॉ. भाग्यश्री, डॉ. सिध्दी, डॉ. आदिती, डॉ. तत्वा, डॉ. मयुर तसेच रशियन डॉक्टर डॉ. सेनिया, डॉ.आरटेम, डॉ. आईवन, डॉ. आना, डॉ. डीना. यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी आकांक्षा राणे यांचे सहकार्य लाभले. त्याबद्दल प्राथमिक शाळेतील शिक्षक, पालक, यांच्याकडून आकांक्षा राणे यांचे अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version