श्रीवर्धनमधील वक्तृत्व स्पर्धांना प्रतिसाद

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

ब्राह्मण सभा, श्रीवर्धनच्यावतीने दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही 31 जुलै व 1 ऑगस्ट रोजी लाकमान्य टिळक पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धा दत्त मंदिर सभागृह येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.

वक्तृत्व स्पर्धांसाठी इ.पहिली-दुसरीपासून महाविद्यालयापर्यंतचे 07 गट करण्यात आले असून स्पर्धेसाठी रायगडावरील शिवराज्याभिषेक, मला आवडलेलै पुस्तक, सरकारी योजनांचे फायदे-तोटे, योगासनांचे महत्व आदि विविध विषय ठेवण्यात आले होते. या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून अ‍ॅड.संजीव डेगवेकर, प्रदीप रिकामे, मंजिरी जोशी व मनोज कातकर यांनी काम पाहिले तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पळधे यांनी केले. स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच यावेळी वार्षिक परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.

Exit mobile version