। डोंबिवली । प्रतिनिधी ।
डोंबिवलीत भर चौकात एका रिक्षा चालकानेच दुसऱ्या रिक्षा चालकाची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
डोंबिवली पूर्वेतील भोईरवाडी खंबालपाडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. भर चौकात एका रिक्षा चालकाने दुसऱ्या रिक्षा चालकाची डोक्यात रॉड घालून निर्घृणपणे हत्या केली आहे. अश्विन कांबळे असे मयत रिक्षा चालकाचे नाव असून हत्या करणाऱ्या आरोपी रिक्षा चालकाचे नाव सुनील राठोड असे आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले असून त्यांनी याप्रकरणी तपासाला सुरूवात केली आहे.