। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत लाडीवाली येथे असलेल्या कोकण ज्ञानपीठ शैक्षणिक संकुलाच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नव्याने स्टॅन्ड बनविण्यात आला आहे. या परिसरात जागृत देवस्थान असलेल्या श्री कोठारी मातेच्या नावे हे रिक्षा स्टॅन्ड बनविण्यात आले असून या रिक्षा स्टँडची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यलयात करण्यात आली आहे. दरम्यान, कर्जतचे माजी नगराध्यक्ष आणि कोकण ज्ञानपीठ संस्थेचे सदस्य शरद लाड यांच्या हस्ते या नवीन रिक्षा स्टॅन्डच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
कोकण ज्ञानपीठ संस्थेच्य संकुलात अभियांत्रिकी, आयुर्वेद मेडिकल, नर्सिंग तसेच फार्मसी यांची पदवी पर्यंत शिक्षण देणारी 50 हुन अधिक महाविद्यालयांची साखळी आहे. याचवेळी बाजूलाच कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे पदवी आणि पदवीत्तर शिक्षण दिले जात असून या शैक्षणिक संकुलात साधारण 3 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे शैक्षणिक संकुल कर्जत रेल्वे स्थानकापासून तीन ते साडे तीन किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे स्कूल बस निघून गेल्यावर मोठी आर्थिक रक्कम खर्च करून विद्यार्थ्यांना अन्य वाहनांचा वापर करून महाविद्यालयात पोहचावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांना शेअर रिक्षाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नोंदणीकृत रिक्षा स्टॅन्ड बनविण्यात आला आहे.