। भंडारा । प्रतिनिधी ।
भंडारा जिल्ह्यातील तुमसर रोड (देव्हाडी) ते रामटेक मार्गावर भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका वाळूच्या ट्रकनं दुचाकीस्वाराला चिरडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त ट्रक गोंदियाच्या दिशेने जात होता. याच दरम्यान स्टेशन टोली येथील रहिवासी दयाराम पुनाजी मोहरकर हे आपल्या दुचाकीने जात असताना, ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दयाराम मोहरकर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.







