शाळकरी मुलाला मारहाण

। धाटाव । वार्ताहर ।

देवकान्हे गावातील मराठी शाळेच्या पटांगणात दोन विद्यार्थी खेळत होते. त्यांच्यात खेळण्याच्या कारणावरून धक्काबुक्की झाली असता त्याठिकाणी फवारणी करणार्‍या इसमाने एका विद्यार्थ्याला कानाखाली व पाठीवर हाताने मारहाण केल्याप्रकरणी रोहा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवकान्हे गावातील मराठी शाळेच्या पटांगणात विराट येलकर आणि सम्यक जाधव हे दोघं जण शाळेच्या पटांगणात खेळत होते. त्यांच्यात खेळण्याच्या कारणावरून धक्काबुक्की झाली असता त्याठिकाणी फवारणी करणारे उमाजी कोंडे याने विराट येलकर या विद्यार्थ्याला मारहाण केली. या प्रकरणी कोंडे यांच्या विरोधात फिर्यादी राकेश येलकर याने तक्रार दिली आहे.

Exit mobile version