दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या 87 जणांचा शोध सुरू

। मुंबई । वार्ताहर ।
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ‘ओमिक्रॉन’ने जगभरात दहशत निर्माण केली आहे. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारच्या डेल्टा प्रकाराने भीती निर्माण केली होती. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जगभरात आता खबरदारी घेतली जात आहे.
ओमिक्रॉनचा उगम दक्षिण आफ्रिकेत झाला. दक्षिण आफ्रिकेतून आतापर्यंत ८७ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. या ८७ जणांचा शोध सुरू आहे. या ८७ जणांचे अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत कोविडच्या ओमिक्रॉन विषाणूचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. या ८७ प्रवाशांचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा होणार आहे.
13 देशांतून येणार्‍या विमानांसाठी आणि प्रवाशांसाठी महाराष्ट्रात समान नियम असायला हवेत, असे आज येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याचे आवाहन मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

Exit mobile version