। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्र सरकारने नवीन आयकर नियमावली अधिसूचित केली आहे त्यानुसार, पीएफवरील व्याज मोजण्यासाठी पीएफ खात्यातच एक वेगळे खाते उघडले जाणार आहे. नवीन अधिसूचनेनंतर, सर्व कर्मचारी भविष्य निधी खाती करपात्र आणि कर-नसलेल्या योगदान खात्यांमध्ये विभागली जातील.
अधिसूचनेनुसार 31 मार्च 2021 पर्यंत कोणत्याही योगदानावर कोणताही कर लावला जाणार नाही, परंतु 2020-21 आर्थिक वर्षानंतर पीएफ खात्यांवर मिळणारे व्याज करपात्र असेल आणि त्याची स्वतंत्र गणना केली जाईल. पीएफ खात्यात 2021-22 आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये वेगवेगळी खाती असतील. नवीन नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील, परंतु 2021-22 आर्थिक वर्षापर्यंत, जर तुमच्या खात्यात वार्षिक ठेव 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर मिळणारे व्याज करपात्र असेल. आणि त्यावर तुम्हाला कर भरावा लागेल. लोकांना पुढील वर्षाच्या आयकर विवरणपत्रात या व्याजाची माहिती द्यावी लागेल.