। पेण । प्रतिनिधी ।
पेण विधानसभा मतदार संघामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 15 पैकी 8 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, 7 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यामुळे पेण विधानसभा मतदार संघात सप्तरंगी लढत पहायला मिळणार आहे. यामध्ये शेकापकडून अतुल नंदकूमार म्हात्रे, भाजप रविंद्र दगडू पाटील, शिवसेना उबाठा गट प्रसाद खेळुराम भोईर, बहुजन समाज पार्टी अनुजा केशव साळवी, अभिनव भारत मंगल परशूराम पाटील, वंचित बहुजन आघाडी देवेंद्र मारुती कोळी, तर अपक्ष म्हणून विश्वास मधूकर बागुल हे उमेदवार आहेत. जरी सात उमेदवार असले तरी खरी लढत ही अतुल म्हात्रे, रविंद्र पाटील आणि प्रसाद भोईर यांच्यामध्ये पहायला मिळणार आहे.
पेणमध्ये सप्तरंगी लढत
