विश्वनाथन आनंदच्या अव्वल स्थानाला धक्का

गुकेश सर्वोच्च स्थानी विराजमान

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने अखेर 37 वर्षांनंतर आपली बुद्धिबळातील बादशाहत गमावली आहे. आनंदने अव्वल स्थान गमावले असून, ग्रँडमास्टर डी गुकेश, हा 17 वर्षीय खेळाडू आता सर्वोच्च क्रमांकाचा भारतीय बुद्धिबळपटू बनला आहे. आनंदने तीन दशकांहून अधिक काळानंतर भारताचा अव्वल बुद्धिबळपटू हे स्थान गमावलं आहे. आनंद जुलै 1986 पासून भारताचा अव्वल खेळाडू होता.

अझरबैजान येथे झालेल्या बुध्दीबळ विश्वचषकादरम्यान गुकेशला उपांत्यपूर्व फेरीत मॅग्नस कार्लसनकडून पराभव पत्करावा लागला. तरीदेखील तो क्रमवारीत आनंदच्या पुढे जात जगात 8 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गुकेशने प्रथमच रेटिंग लिस्टमध्ये टॉप 10 मध्ये प्रवेश केला आहे. पाच वेळा विश्वविजेता राहिलेला आनंद आता 9व्या क्रमांकावर आहे.
1 सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या रेटिंगनुसार, गुकेशचे रेटिंग 2758 आहे तर आनंदचे रेटिंग 2754 आहे. गुकेशला 1 ऑगस्टपासून रेटिंग यादीत तीन स्थानांची बढत मिळाली. गुकेशचे सध्याचे रेटिंग 2758 आहे तर आनंदचे रेटिंग 2754 आहे.

Exit mobile version