| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अलिबाग तालुक्यातील मॉडेल संघ रांजणखार येथे 67 वी खुली शुटींग बॉल स्पर्धा आयोजित केली आहे. राज्यस्तरिय होणारी ही स्पर्धा शनिवारी(दि.17) स्व. गण पोशा पाटील क्रीडा नगरी रांजणखार येथे घेतली जाणार आहे. क्रीडा संघटक व ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेचे यजमानपद मॉडेल संघ रांजणखारकडे आहे. या संघासह रायगड जिल्ह्यातील खारेपाटातील स्थानिक संघ, विद्यूत क्रिडा मंडळ मांडवखार, बहिरीदेव स्पोर्ट्स क्लब बहिरीचापाडा, ए.वन. माणकुले, वीर बहिरीचापाडा, लिबर्टी नारंगी, हनुमान वाघ्रण, फ्रेंडस् ग्रुप रांजणखार तसेच बाहेरील नामवंत शुटींगबॉल संघ, क्रांती कुंडल जामनेर, आएसीसी मालेगाव, इस्तियक मालेगांव, मणेराजूरी सांगली, माळशिरस सोलापूर, खानापूर सांगली, टेंभूर्णी सोलापूर, सातारा शासकीय दुध योजना पुणे, कावेरी नगर पुणे, महाड, कल्याण, सिंधुदूर्ग, मुंबई पोर्ट ॲथोरिटी, मुंबई महानगरपालिका, यमुना नगर पुणे, भारती विद्यापीठ पुणे, आरएमएमएस मुंबई, आरमार विक्रांत मुंबई, हे संघ सहभागी होणार आहेत. या संघातील खेळाडूंचा अप्रतिम खेळ पाहण्याची संधी क्रीडा प्रेमींना मिळणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संघाचे पदाधिकारी व सदस्य मेहनत घेत असून ही तयारी अंतिम टप्प्यात आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी क्रिडा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन कुलाबा रायगड शुटींगबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले आहे.
रांजणखारमध्ये शनिवारी शुटींगबॉल स्पर्धा
