| जळगाव | वृत्तसंस्था |
आदिवासी कुटुंबातील सहा वर्षीय बालिकेवर नराधमाने अत्याचार करून तिला ठार केले हि घटना जामनेर तालुक्यातील एका गावात (दि.11 )मंगळवारी रात्री 11.30 वाजता घडली आहे. मंगळवारी दुपारी या बालिकेचे आई-वडील शेतात गेले होते. दुपारी तिला आरोपीने दुकानावर जाऊ, असे सांगत सोबत नेले. सायंकाळी उशिरापर्यंत मुलगी घरी आली नाही. म्हणून आई-वडीलांसह नातेवाइक शोध घेत होते. रात्री गावातील एका शेतात मृतावस्थेत आढळली. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी करीत आहेत.