गुरुपौर्णिमा निमित्त विशेष सन्मान

। नेरळ । प्रतिनिधी ।

पळसदरी येथील अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमा हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. यावेळी गुरुपौर्णिमा निमित्त समाजात विविध क्षेत्रात विशेष कार्य करणार्‍या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला.

स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वामींच्या सगुण पादुकांवर अभिषेक, गुरूपाद्य पुजन, दत्त याग तसेच दुपारी आरती, गुरुपौर्णिमा अन्नदान ग्रुपच्या वतिने महाप्रसाद व मस्वरांजलीफ हा दृष्टीबाधीतांचा भावभक्तीगीतांचा कार्यक्रम साजरा झाला. दुपारच्या मस्वरांजलीफ कार्यक्रमाच्या दरम्यान समाजातील अनेक मान्यवरांचे सन्मान करण्यात आले. पळसदरी पंचक्रोशीतील चार्टर्ड अकाउंटंट होण्याचा मान मिळवलेल्या सिद्धी संजय शिंदे, पत्रकार अभिजीत दरेकर, प्रभाकर गंगावणे, प्रशांत खराडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळी विक्रांत दरेकर, राजू पोतदार, अ‍ॅड.प्रदीप सुर्वे, ज्ञाऩेश्‍वर दुधे, रघुनाथ निगुडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version