| औरंगाबाद | वृत्तसंस्था |
मराठवाडा स्वातंत्र्यलढ्याच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत एकूण 59 कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यात सिंचनासाठी 27 हजार कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. याशिवाय राज्यातील नदीजोड प्रकल्पासाठी सरकारने 14 हजार कोटींच्या निधीची तरतुदी केल्या आहेत . या माध्यमातून दुष्काळग्रस्त मराठवाड्याला मोठा दिलासा दिला असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे .
सुधारित 35 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. 8 लाख हेक्टर जमीन यामुळे ओलीताखाली आली. गोदावरी खोऱ्यात पाणी वळवण्यात येणार आहे. त्यावर 13 हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे. सिंचनावरील 14 हजार कोटी आणि गोदावरी खोऱ्यासाठीचे 13 हजार कोटी असे मिळून सिंचनावर एकूण 27 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
बऱ्याच वर्षांनी मराठवाड्यात मंत्रीमंडळाची बैठक होत आहे. दरम्यान ही बैठक होऊच नाही यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. मागील बैठकीत आम्ही 31 निर्णय घेतले होते. 2017 मध्ये यातील 10 विषय मार्गे लागले होते. तर आज घडीला यातील 23 विषय मार्गे लागली असून, 7 विषय प्रगतीपथावर असल्याचं फडणवीस म्हणाले. तर महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या अडीच वर्षांच्या काळात काय केले? असा प्रश्न देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. मंत्रे व सचिवांसाठी पंचतारांकित हॉटेल्स आरक्षित करण्यात आली होती. पण मिडियातून टीका झाल्यामुळे शुक्रवारी रात्री निर्णय बदलण्यात आला व सरकारचा ताफा सुभेदारी विश्रामगृहात गेला.