बुल्सचे नेत्रदीपक पुनरागमन

। हैदराबाद । वृत्तसंस्था ।

प्रो-कबड्डी लीगमध्ये बेंगळुरू बुल्सने नेत्रदीपक पुनरागमन करत मंगळवारी (दि.29) गचीबोवली इनडोअर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दबंग दिल्ली केसीचा 34-33 असा पराभव केला. दिल्लीचा पाच सामन्यांमधील हा तिसरा पराभव आहे.

प्रो-कबड्डी लीगमध्ये 24 वा सामना बेंगळुरू बुल्स आणि दबंग दिल्ली यांच्यात खेळला गेला. बेंगळुरू बुल्सने या सामन्यात चमकदार कामगिरी केली आणि प्रो-कबड्डी लीग सीझन-11 मध्ये पाचव्या सामन्यानंतर पहिला विजय मिळवला आहे. बंगळुरू बुल्सने या सामन्यात दबंग दिल्ली केसीचा अवघ्या 1 गुणांनी पराभव केला. या सामन्यात दबंग दिल्लीचा रेडर आशु मलिकने सर्वाधिक 13 गुण तर बेंगळुरू बुल्सकडून जय भगवानने सर्वाधिक 11 गुण मिळवले. आशु मलिक आणि जय भगवान या दोघांनी सुपर-10 आणि नितीनने या सामन्यात हाय-फाइव्ह पूर्ण केले.

Exit mobile version