। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी येथील प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेला पालक वर्गाचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला. येथील मुख्याध्यापिका लिना खराडे व शिक्षिका सकपाल यांच्या संकल्पनेतून व शालेय विविध उपक्रमांतर्गत सर्व माता पालकांनी उत्तमरित्या सहभाग दर्शवून आपापल्या पाककृतींचे उत्तम सादरीकरण केले. यावेळी त्यांनी आळू वडी, मुगडाळ इडली, अप्पे, शिरा, नाचणी सत्त्व, लापशी, आळु फतफतं, रवा मेदू वडा, रवा लाडू, मेथी लाडू, मेथी पराठे, बटाटा रोल, तिरंगी डोसे इत्यादी बनवून आणलेले पदार्थ अतिशय रुचकर, स्वादिष्ट तसेच पौष्टिक असे होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक दर्शना दिपक मरवडे, द्वितीय क्रमांक कस्तुरी किसन बामणे तर तृतीय क्रमांक सेजल शरद लहाने यांनी पटकावले. स्पर्धेचे परीक्षण सीमा गायकवाड यांनी केले.







