घोसाळगडावर तोफगोळ्यांचा साठा

| तळा | वार्ताहर |

छत्रपती शिवरायांचा वारसा लाभलेला रोहा तालुक्यातील घोसाळे गाव. या गावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा असलेला बुलंद असा बालेकिल्ला घोसाळगड. शिवकार्य प्रतिष्ठान तळा प्रतिष्ठान घोसाळगडावर गड सवर्धनाचे काम करीत आहे. गडावरील सुरुवातीला छोटासा दिसणार्‍या परंतु सलग चार मोहिमेनंतर महाकाय पाण्याचे टाक (हौद )समोर आले होते. पाचव्या मोहिमेमध्ये काम करत असताना भव्य अशी 15 फूटाची तोफ सापडली व सोबतच ऐतिहासिक वारसा असलेले तोफगोळे सापडले. या कामात तालुक्यातील भोईरआळी येथून तरुण व तरुणी काम केले. यावेळी शिवकार्य प्रतिष्ठानचे रायगड विभाग प्रमुख किरण घुडुप, रामभाऊ, जागृती, तसेच 30 ते 35 मावळे व रणरागिणींनी या कामात सहकार्य केले. तसेच स्थानिक विरगड युवा प्रतिष्ठान घोसाळे यांचे सुद्धा सहकार्य लाभले.

Exit mobile version