गोहत्या बंदीचा कठोर कायदा करावा -दिनेश पाटील

| रसायनी | प्रतिनिधी |

आंतरराष्ट्रीय संत परिषदेच्या वतीने आंतरराष्ट्रीय हिंदू धर्म रक्षक पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात व भव्यतेने संपन्न झाला. याप्रसंगी हिंदुत्व रक्षण, संतसेवा व गोसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हिंदू धर्मभूषण, संत परिषद महाराष्ट्र राज्यमंत्री नंदकिशोर वायाळ पाटील यांना आंतरराष्ट्रीय हिंदू धर्म रक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी दिनेश पाटील यांनी आपल्या ओजस्वी भाषणात सरकारला थेट धारेवर धरत म्हटले, ज्या गो-मातेच्या नावावर मते मागितली, ज्या हिंदुत्वाच्या नावावर सरकार स्थापन झाले, त्याच सरकारच्या काळात आज भारत गो-मांस निर्यातीत जगात दुसऱ्या क्रमांकावर कसा पोहोचला? हा कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा घोर अपमान व विश्वासघात आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे तातडीने मागणी करत म्हटले. गो-मातेला राष्ट्रीय माता व संपूर्ण गोवंशाला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करावे. गोहत्येवर संपूर्ण बंदी घालण्यासाठी कठोर केंद्रीय कायदा तात्काळ करावा. जोपर्यंत सरकार हे करत नाही, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय बजरंग दल रस्त्यावर संघर्ष करत राहील.

दिनेश पाटील पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, संत तुकाराम-ज्ञानेश्वर माऊलींची भक्ती परंपरा हीच हिंदुस्थानची खरी ओळख आहे. आता प्रत्येक हिंदूने जागृत होण्याची वेळ आली आहे. लव्ह जिहाद व धर्मांतराच्या विरोधात घराघरातून आवाज उठला पाहिजे. जो हिंदू हिताची बात करेल, तोच या देशावर राज्य करेल, असे दिनेश पाटील म्हणाले.

Exit mobile version