अलिबागमध्ये एसटी कर्मचार्‍यांचा संप चिघळला

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी राज्यात काही ठिकाणी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सणासुदीच्या काळात या संपामुळं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. दुसरीकडे एसटी कर्मचार्‍यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. राज्य सरकारने मांडलेल्या प्रस्तावावर एसटी कामगार संघटनांनी नकार दर्शवल्याने संपाची कोंडी अद्यापही कायम आहे.

राज्यातील 250 एसटी डेपो पैकी 160 डेपो सध्या बंद आहेत. सोमवारी राज्यातील आणखी काही डेपोतील एसटी कर्मचारी या संपामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे एसटी कर्माचार्‍यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपामुळे दिवाळी संपवून गावाकडून घरी परतणार्‍या प्रवाश्यांचे प्रचंड हाल होत आहेत. एसटी डेपोमध्ये प्रवाशांची गर्दी झालेय पण एकही एसटी डेपोतून बाहेर पडत नाहीये.एसटी कर्मचारी संपाला 17 कामगार संघटनांच्या कृती समित्यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. संघर्ष कामगार युनियननेही मसंपूर्ण बंदफ हाक दिल्यामुळे सोमवारपासून राज्यभर एसटी सेवा ठप्प झाली आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे दिवाळी संपवून परतीच्या प्रवासाला निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. प्रवाश्यांना दुसर्‍या गाड्यांचाही पर्याय मिळत नाही. त्यामुळे गावाकडून शहराकडे येणार्‍या प्रवाशांचे हाल होत आहेत.

दरम्यान, राज्य शासनाप्रमाणे एसटी कर्मचार्‍यांनाही 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याची मागणी करत एसटीतील 17 कामगार संघटनाच्या कृती समितीने 27 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यानंतर एसटी कर्मचार्‍यांनी 28 ऑक्टोबरला उत्स्फूर्त संपही सुरू केला. त्यामुळे दिवाळीपूर्वी राज्यातील 70 टक्क्यांहून अधिक एसटी सेवा कोलमडली. एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाची दखल घेत एसटी महामंडळाने समितीच्या मागण्या मान्य करण्याबरोबरच वार्षिक वेतनवाढ आणि विलीनीकरणाच्या मागणीवर दिवाळीनंतर चर्चेचे आश्‍वासन दिले. त्यामुळे समितीने उपोषण आणि संप मागे घेतला. पण काही एसटी डेपोमधील कर्मचार्‍यांनी विलीनीकरण आणि राज्य सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे वेतनश्रेणी देण्याच्या मागणीसाठी संप सुरूच ठेवला. आता हा संप आणखी चिघळळला आहे कारण हळूहळू करत राज्याती इतरही एसटी डेपोमधील कर्मचारी या बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत

Exit mobile version