। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
सुधागड तालुकास्तरीय क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा दि.19 व 20 डिसेंबर या कालावधीत वावळोली येथील अनुदानित आश्रमाशाळेत संपन्न झाल्या. तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव देणे व त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला संधी प्राप्त करून देणे या हेतूने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पेडली केंद्राने दमदार कामगिरी केली आहे.
यावेळी पेडली केंद्राने प्रथम क्रमांकाची 5 बक्षिसे, द्वितीय क्रमांकाची 4 बक्षिसे आणि तृतीय क्रमांकाची 2 बक्षिसे अशी एकूण 11 बक्षिसे प्राप्त केली आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सुधागड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सादुराम बांगारे, वरिष्ठ विस्तार अधिकारी नवनाथ साबळे यांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक वृंद व तालुका स्तरीय स्पर्धेत सहभागी शाळा यांचे केंद्रप्रमुख अनिल राणे यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.






