रिक्षा आणि दुचाकीच्या धडकेत विद्यार्थीनीचा मृत्यू

। पालघर ।वृत्तसंस्था ।

डहाणू-जव्हार मार्गावर रिक्षाला दुचाकीची धडक लागल्याने रिक्षा पलटली. या अपघातात रिक्षात असणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर, सहा जण जखमी झाले आहेत.

डहाणू-जव्हार मार्गावर सोमवारी (दि. 01) सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला. रिक्षाचालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा थेट रस्त्याखाली उतरली. त्याचवेळी समोरून वेगाने येणाऱ्या दुचाकीची रिक्षाला जोरदार धडक लागली. या धडकेत रिक्षा पलटी झाली. यात रिक्षातून प्रवास करणारी इयत्ता आठवीत शिकणारी विद्यार्थिनी संगीता सुभाष डोकफोडे (14) हीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दुचाकीस्वारासह रिक्षाचालक तसेच, रिक्षातील इतर प्रवासी असे सहा जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version