। माणगाव । वार्ताहर ।
सहकार क्षेत्रातील रायगड जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्थांपैकी एक ओळखल्या जाणार्या माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित उतेखोल संस्थेतर्फे 2023-24 या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदविका उत्तीर्ण झालेल्या संस्थेच्या सभासद पाल्यांचा (विद्यार्थ्यांचा) गुणगौरव सोहळा शनिवारी (दि.13) संस्था कार्यालय चौधरी कॉम्प्लेक्स या ठिकाणी संपन्न झाला. संस्थेचे चेअरमन आनंद यादव तसेच संचालक दिलीप जाधव, दिलीप अंबुर्ले, संदीप खरंगटे, अरुण प्रभाळे, दीप्ती मोरे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत तसेच संस्थेचे सभासद, व्यवस्थापक, कर्मचारीवृंद, पालकवर्ग यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.
यावेळी पतसंस्थेतर्फे दहावीचे विद्यार्थी श्रावणी गवळी, नहुष भोनक, दिव्या दिवेकर, सायली मोरे, वेदांत केकाणे, आनम शेख, सादीक यतीनमणी, संस्कार पालकर, ओम पारकर, तन्वी गुगळे, रुची तळकर, अवधूत जाधव, सार्थक भोसले, नीलम गावडे, मधुरा अहिरे, ओमकार उंडरे, सिदरा परदेशी. बारावीचे विद्यार्थी पार्थ शेट, मयूरी मिरजक, प्राची मसुरे, श्रेयश कळस, हर्ष जाधव, अनन्या बामणे, प्रणाली उंडरे. तसेच पदवी पदवीका विद्यार्थी तेजस गोसावी, कृपाली जाधव, प्राची वाढवळ, चैतन्य देशमुख, डॉ.कुणाल गवळी आदींना आकर्षक सन्मान चिन्ह, रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.