प्रियकरावर अपहरणाचा गुन्हा दाखल
| महाड | प्रतिनिधी |
रायगड किल्ला पाहण्यासाठी आलेल्या शैक्षणिक सहलीमधील एक विद्यार्थिनी आपल्या प्रियकराबरोबर तिथूनच पळून गेली. या घटनेने सहलीमधील विद्यार्थिनी, शिक्षक वर्गदेखील चांगलाच हादरला. सदर घटना पोलिसांना कळतात त्यांनी शोध घेतला असता सदर विद्यार्थ्यांनी आलेल्या प्रियकराबरोबर पळून गेल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी महाड तालुका पोलिसांनी प्रियकरावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
महाड तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जामनेर येथून एका शैक्षणिक संस्थेची सहल किल्ले रायगड पाहण्यासाठी आले होते. रायगडावरून खाली उतरल्यानंतर परतत असताना एक विद्यार्थिनी गाडीमध्ये कमी असल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास झाले. सदर विद्यार्थिनीने आपल्या सोबत असलेल्या मैत्रिणींना तुम्ही पुढे व्हा मी मागून येते असे सांगितले होते. एक विद्यार्थिनी कमी असल्याचे निदर्शनास येतात शिक्षकांचे देखील धाबे दणाणले. याबाबतची खबर शिक्षकांनी पोलिसांना दिली. यावरून पोलिसांनी शोध घेणे सुरू केले असता येथील खर्डी गावाजवळ सदर विद्यार्थ्यांनी एका तरुणाबरोबर दुचाकीवरून जात असल्याचे दिसून आले. यावरून शोध घेतला असता जामनेर येथील 19 वर्षीय तेजस पाटील या प्रियकराबरोबर सदर विद्यार्थिनी गेली असल्याचे स्पष्ट झाले.
तेजस पाटील हा सहलीबरोबरच जामनेर येथून बसचा पाठलाग करत किल्ले रायगड पर्यंत आला होता. चित्त दरवाजा येथून सदर विद्यार्थिनीला सोबत घेऊन तेजस पाटील पुण्याच्या दिशेने जात असताना मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी तेजस पाटीलला ताब्यात घेतले आहे. याबाबत महाड तालुका पोलिसांनी तेजस पाटील याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.