| म्हसळा | वार्ताहर |
पुणे-दिघी 753 या राष्ट्रीय मार्गावरील माणगाव – म्हसळा या रस्त्यावर घोणसे घाटातील केळेवाडी येथील तीव्र उतार आणि घोकदायक वळणावर साखरेची वाहतूक कऱणार्या ट्रकला अपघात झाला. अपघातात चालक जखमी झाला. या ट्रकमधील साखर रोहा रेल्वेस्टेशन येथून दिघी बंदर मार्फत अन्य देशांत निर्यात होणार होती. माणगाव बाजूने वेगाने आलेला ट्रक चालकाने नियंत्रण करण्याकरीता उजवीकडे वळविला असता तो उंच माल आसल्याने जागेवरच पलटी झाला. अपघातात प्रदीप काळोखे, या चालकाच्या डोक्याला मार लागल्याने म्हसळा ग्रामीण रुग्णालयांत त्याच्यावर उपचार करण्यात आले.
घोणसे घाटात साखरेचा ट्रक पलटी
