घोणसे घाटात सिमेंटच्या ट्रकला भीषण अपघात

ट्रक आणि मालाचे प्रचंड आर्थिक नुकसान

| म्हसळा | वार्ताहर |

अपघातग्रस्त घोणसे घाटातून सिमेंट घेऊन नागोठण्याकडून म्हसळाकडे येणार्‍या ट्रकला शुक्रवारी सकाळी 10 वाजता भीषण अपघात झाला. अपघातात ट्रक क्र. एमएच 06 बीडी 1217 हा भरधाव असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या एका मोरीजवळ डोंगरावर आदळला. यामध्ये ट्रक आणि आतील सिमेंटचे भयंकर नुकसान झाले.

हा ट्रक नागोठण्याकडून म्हसळ्याकडे येत असता घोणसे घाटातील केळेवाडी या परिसरात तीव्र उतार आणि शीघ्र वळणावर चालकाचे भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघातात ट्रक आणि आतील मालाचे भयंकर नुकसान झाले. सदर अपघात आज शुक्रवार, दि. 10 रोजी सकाळी झाला. पोलीस कर्मचारी नवीन असल्यामुळे अपघाताची नोंद आणि डीआर देण्यास विलंब होत असल्याचे प्रभारी अधिकारी एपीआय पवन चौधरी यांनी सांगितले.

Exit mobile version