तिघेजण गंभीर जखमी
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा महामार्गावर देवधे धनावडे शेती फार्म येथे शनिवारी (दि.14) सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास कार व दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीवरील तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पती-पत्नीसह त्यांच्या 12 वर्षीय मुलाचा समावेश आहे. स्वप्नील जयप्रकाश चव्हाण (37), सोनाली स्वप्नील चव्हाण (34), सूजन स्वप्नील चव्हाण (12) सर्वेश स्वप्नील चव्हाण (4) अशी जखमींची नावे आहेत.
कार चालक राजेंद्र सत्यनारायण शाहू (43) हे मुंबई-गोवा महामार्गावरून आपल्या ताब्यातील कार (एमएच-48-सीसी-4482) घेऊन लांजा येथे जात होते. कार देवधे धनावडे शेती फार्म येथे आली असता समोरून येणार्या दुचाकी (एमएच-08-एजे-0934) ची समोरासमोर जोरदार धडक बसली. यावेळी दुचाकीचालक व त्यांच्या मागे बसलेली त्यांची पत्नी व त्यांची दोन मुले श्रुजन व सर्वज्ञ हे रस्त्यावर जोरदार आदळले. यामध्ये स्वप्नील यांच्या पायाला तर सोनाली यांच्या डोक्याला व पायला गंभीर दुखापत इाली आहे. यासह 12 वर्षीय सृजन याच्या पायाचा अंगठा तुटला आहे. या अपघातात जखमी झालेल्या पती-पत्नी व मुलगा अशा तिघांनाही रुग्णवाहिकेने रत्नागिरी येथे एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.