| पालघर | प्रतिनिधी |
पालघर मधील सारणी उर्से रोडवर इको कारचा भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी (दि.19) रोजी घडली आहे.चालकाचे नियंत्रण सुटल्याने इको कार पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत कारचं देखील काही प्रमाणात नुकसान झालं आहे. इकोमधील एका तरुणीचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालय आणि वेदांत मेडिकल हॉस्पिटल धुंदलवाडी येथे उपचार सुरू आहे. तरूणीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. ओव्हर सीट भरून वाहतूक करणाऱ्या अनधिकृत वाहतुकीकडे आरटीओ आणि पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याच्या चर्चा देखील या घटनेनंतर होताना दिसत आहेत.






