I पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील पेण-वाशी रस्त्यावर सोमवारी (दि.22) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रिक्षा आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक महिला गंभीररित्या जखमी झाल्याने मृत्यू पावली. तर, रिक्षा चालक जखमी झाला. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मौजे वाशी गावच्या हद्दीत वाशी नाका ते वाशी असा प्रवास करणाऱ्या भरधाव कारने (एमएच 06 बीडब्ल्यू 2086) समोरून येणाऱ्या रिक्षाला (एमएच 06 झेड 2608) जोराची धडक दिली. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.