दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील इंदापूर एसटी बसस्थानक ते माणगाव एसटी बसस्थानकदरम्यान महिलेच्या बॅगेतील सुमारे 2 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून अज्ञात चोरटा पसार झाला आहे. ही घटना दि.14 मे रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 2.30 वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबतची तक्रार ही दिघी सागरी पोलीस ठाण्यात दाखल लकरण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद अंकिता विलास कडू (42) सध्या रा. वडाळा पूर्व, मूळ रा. वाकळधार, ता. श्रीवर्धन यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. या घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील फिर्यादी महिला अंकिता विलास कडू यांचे एक 5 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जुने वापरते अंदाजित किंमत 1 लाख 50 हजार रुपये, दीड तोळे वजनाचा सोन्याचा हार जुना वापरता अंदाजित किंमत 45 हजार रुपये, एक सोन्याची चेन दीड तोळे वजनाची जुनी वापरती अंदाजित किंमत 45 हजार रुपये असे एकूण 2 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने इंदापूर ते माणगावदरम्यान चोरून अज्ञात चोरटा पसार झाला आहे. या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. गायकवाड हे करीत आहेत.

Exit mobile version