उरण मतदार संघात तिरंगी लढत

। चिरनेर । प्रतिनिधी ।

उरण विधानसभा मतदार संघातील एकूण 16 उमेदवारांपैकी संतोष हिराजी ठाकूर व जितेंद्र दामोदर म्हात्रे या 2 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. आता 16 पैकी 14 उमेदवार निवडणुकीच्या लढतीत राहिले आहेत. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रितम जनार्दन म्हात्रे, शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार मनोहर गजानन भोईर व भारतीय जनता पार्टीचे (अपक्ष) विद्यमान आ. महेश बालदी यांच्यात तिरंगी लढत होणार असून, मनसेचे सत्यवान पंढरीनाथ भगत, बहुजन समाज पार्टीचे सुनिल मारुती गायकवाड, लोकराज्य पार्टीचे महेश गणपत कोळी, अपक्ष श्रीकन्या तेजस डाकी, अपक्ष कुंदन प्रभाकर घरत, अपक्ष निलम मधुकर कडू, अपक्ष बाळकृष्ण धनाजी घरत, अपक्ष कृष्णा पांडुरंग वाघमारे, अपक्ष मनोहर परशुराम भोईर, अपक्ष प्रितम धनाजी म्हात्रे व अपक्ष प्रितम बळीराम म्हात्रे हे 11 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.

Exit mobile version