पाच गडी राखून ऑस्ट्रेलियाचा रोमहर्षक विजय

मॅक्सवेलच्या शतकी खेळीपुढे भारतीय गोलंदाज भुईसपाट
| गुवाहाटी | वृत्तसंस्था |
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा मंगळवारी पार पडला. गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी शतकाच्या जोरावर भारताचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज गायकवाडच्या शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 223 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 20 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर 225 धावा करत विजय नोंदवला.

तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 3 गडी गमावून 222 धावा केल्या होत्या. भारताकडून ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 57 चेंडूत 123 धावांची खेळी केली. भारताकडून टी-20 मध्ये शतक झळकावणारा ऋतुराज आठवा भारतीय ठरला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावणार पहिला भारतीय ठरला आहे.

प्रत्युत्तरा भारतीय संघाला अखेरच्या षटकात 21 धावा वाचवता आल्या नाहीत. प्रसीध कृष्णा शेवटच्या षटकांत गोलंदाजी करण्यासाठी आला होता,पण भारताचा 21 धावांचा बचाव करु शकली नाही. मॅक्सवेल आणि वेडने इतक्या धावा करून ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत नेले.

शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वेडने चौकार मारला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव आली. यानंतर मॅक्सवेलने तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर चौकार मारला. मॅक्सवेलने पाचव्या चेंडूवर चौकार मारून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चौथे शतक पूर्ण केले. त्याने 47 चेंडूत शतक झळकावले. शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला दोन धावांची गरज होती आणि मॅक्सवेलने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने 48 चेंडूत 104 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याचवेळी, मॅथ्यू वेड 16 चेंडूत 28 धावांवर नाबाद राहिला.

ग्लेन मॅक्सवेल आता रोहित शर्मासह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला आहे. दोघांनी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन शतके झळकावली आहेत. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत पुनरागमन केले आहे. मालिकेत भारत अजूनही 2-1 ने आघाडीवर आहे. या मालिकेतील चौथा सामना रायपूरमध्ये 1 डिसेंबरला होणार आहे.

Exit mobile version