बाकावरून पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू

। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।

सिमेंटच्या बाकावरून खाली पडल्याने चार वर्षीय तेजस साकेत पटेल याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली. स्वप्नपूर्ती सोसायटी, खारघर येथे नवरात्र उत्सवाला प्राची पटेल आणि त्यांचा मुलगा तेजस हे गेले होते. स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये सार्वजनिक नवरात्र उत्सव असल्याने गरबा बघण्यासाठी तेथे असलेल्या सिमेंटच्या बाकावर खेळत असताना त्याचा तोल गेला. तो डोक्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला. त्याच्या डोक्यातून आणि कानातून रक्तस्त्राव झाला. यावेळी त्याला मैत्री हॉस्पिटल, खारघर, सेक्टर 5 येथे नेण्यात आले. त्यानंतर त्याला एमजीएम हॉस्पिटल बेलापूर येथे नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Exit mobile version