सेंट मेरी विद्यालयातील विद्यार्थीनीचा भीषण अपघात; ट्रक चालक फरार

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

अलिबाग – कुरुळ मार्गावर गुरुवारी झालेल्या अपघातात सेंट मेरी विद्यालयात बारावीचे शिक्षण घेणाऱ्या सिमरन घटानी या विद्यार्थीनीला गंभीर दुखापत झाली. तिच्या वडिलांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढिल उपचारासाठी नवी मुंबईत हलविण्यात आले. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात औषधोपचार सुरु आहेत.
ही घटना गुरुवारी (दि.२१) सकाळी पावणे सात वाजता घडली. या घटनेनंतर ट्रक चालक पळून गेला असून कोणीही ट्रकचे फोटो किंवा नंबर घेतला असल्यास ९७६६५२५४५७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नातेवाईकांकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version