आगीत ट्रेलरची केबिन जळून खाक; सुदैवाने चालक बचावला
| खोपोली | प्रतिनिधी |
मुबंई – पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी (दि.10) रोजी रात्री शॉर्टसर्किट होऊन ट्रेलरच्या केबिनला भीषण आग लागली असून, या आगीत ट्रेलरची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली आहे, सुदैवाने चालक बचावला आहे.
मुबंई – पुणे द्रुतगती मार्गावरून ट्रेलर हा पुण्यावरून जेएनपीटीकडे जात असताना तो बोरघाटात फूडमॉल जवळ आला असता, त्याच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन केबिनला भीषण आग लागली, चालकाने तत्परतेने ट्रेलर थांबवून चालक बाहेर पडल्याने सुदैवाने बचावला आहे. मात्र, या आगीत ट्रेलरची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच देवदूत यंत्रणा आणि खोपोली नगरपालिकेचे अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे शर्थिने प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आणण्यात आली.